आजकाल फिटनेस, डाएट बाबत जागरूक झालेली अनेक लोकं आहेत...
प्रत्येकाची फिटनेस ची व्याख्या वेगवेगळी आहे आणि तो मिळवण्याची पद्धत देखील.
फिटनेस म्हणजे नेमकं काय?
शरीर दिसायला सुटसुटीत, पिळदार ?
स्नायूंना पंप ?
की दररोज चालणं आणि दम न लागणं?
माझ्यासाठी, फिटनेस म्हणजे स्वतःच्या शरीराला आणि मनाला नीट ओळखणं.
शरीरावर जबरदस्ती नाही, पण थोडीशी कसोटी.
थोडीशी शिस्त आणि मनावर ताबा
फिटनेस म्हणजे फक्त शरीर नाही.
फिटनेस म्हणजे –
दिवसभरात स्फूर्ती टिकवणं
झोप व्यवस्थित लागणं
जे खाल्लंय ते पचणं
संयम असणे आणि सगळ्यात महत्त्वाचं –
स्वतःशी शांत संवाद ठेवणं
खरतर यासाठी नेमका काही एक "फॉर्म्युला" आहे असे सांगणे जरा धाडसाचे ठरेल. प्रत्येक शरीराची भाषा वेगळीअसते,
– एखाद्याचं शरीर लवचिक असतं, पण मन चंचल
– एखाद्याचं मन स्थिर, पण शरीर थकलेलं
– कुणाचा पचन उत्तम, कुणाला दररोज अपचन
म्हणूनच या बाबतीत 'एक साचा' चालत नाही. स्वतःच्या शरीराशी आणि मनाशी संवाद साधणं आणि त्यानुसार काम करणे ना की दुसऱ्याची कॉपी करणं. या बाबतीत दुसऱ्याची कॉपी करणे महागात पडू शकते कारण एकच "व्यक्ती तितक्या प्रकृती".
तंदुरुस्ती म्हणजे ‘सगळ्यांसारखं दिसणं’ नव्हे,
तर ‘स्वतःसारखं भासणं’ — ते टिकवणं, जपणं हे महत्वाच.
आपल्याला ज्यात आनंद वाटतो मन आनंदी व उत्साही होते, उल्हास वाटतो अशा कोणत्याही व्यायाम प्रकाराने व त्याला पुरक आहाराने स्वतःचे शरीर मन आनंदी ठेवता येणं म्हणजे खरा "फिटनेस"
कारण
W.H.O. ने केलेली आरोग्याची व्याख्या पण हेच सांगते..
"केवळ रोग वा दुर्बलता नसणे एवढेच आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्ट्या संपूर्ण निरामय स्थिती म्हणजे आरोग्य होय."

1 Comments
यावर मला तुम्हा अनुभवी लोकांच मत जाणून घ्यायला आवडेल
ReplyDelete🗨️ तुमचं मत खाली जरूर कळवा! नाव टाकून साधं "छान वाटलं" लिहिलंत तरी आम्हाला बळ मिळेल 🙏