डोंगराच्या वाटा आत्मभान देतात,
तर योगाचे आसन शरीरात शांतता देतात.
या दोघांची संगत आपल्याला कधीही वाट चुकू देणार नाही...
पण त्यासाठी शरीराला 'जरा' कष्ट द्यायची तयारी पाहिजे!
---
डोंगर चढताना श्वास लागतो,
आणि हे "वृक्षासन" करताना तोच श्वास संयमी आणि स्थिर होतो.
ट्रेकिंग आणि योग —
दोन वेगवेगळ्या वाटा, पण दोघंही आपल्याला तंदुरुस्तीच्या जवळ नेतात —
शरीराच्या आणि मनाच्या देखील.
---
टेकड्या आपल्याला भटकंती देतात,
तर योगासन आपल्याला स्थैर्य आणि संयम शिकवतात.
एकात धडपड आहे, दुसऱ्यात सावरणं आहे.
ट्रेक करताना उतार-चढावात आपण आपली सहनशक्ती शोधतो,
आणि योग करताना शरीरातली प्रत्येक हालचाल आपल्याला
स्वतःच्या आतल्या हालचाली सांगते.
---
#योग_सुंदर_आहे
#टेकडीतेताडासन
चालता-बोलता योगी 🚶♂️🧘♂️

1 Comments
यावर मला तुम्हा अनुभवी लोकांच मत जाणून घ्यायला आवडेल
ReplyDelete🗨️ तुमचं मत खाली जरूर कळवा! नाव टाकून साधं "छान वाटलं" लिहिलंत तरी आम्हाला बळ मिळेल 🙏