About

 

🙋‍♂️ माझ्याबद्दल

Tekdi ते ताडासन हा ब्लॉग माझ्या वैयक्तिक योग प्रवासाचा, चिंतनाचा आणि अनुभवाचा संगम आहे. मी एक योगप्रेमी व योगशिक्षक असून, शरीर-मन आणि आत्म्याची एकरूपता साधण्यासाठी रोज नवनवीन प्रयोग करीत आहे.

योग म्हणजे केवळ आसन नव्हे, तर तो एक संपूर्ण जीवनशैली आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला योगासने, प्राणायाम, ध्यान, शरीरसंपदा, मानसिक स्पष्टता, आणि आत्मानंद या सर्व विषयांवर आधारित लेख, टिप्स आणि अनुभव वाचायला मिळतील.

याच बरोबर....

"मला निसर्गात वेळ घालवायला, टेकड्यांवर भटकायला आणि नवनवीन ट्रेक करायला खूप आवडतं.

ट्रेकिंग म्हणजे केवळ प्रवास नाही, तर तो माझ्यासाठी एक आत्मशोधाचाही मार्ग आहे 

"ट्रेकिंग माझं एक आवडतं व्यसन आहे.

मला टेकड्यांवर, किल्ल्यांवर, घाट वाटांवर फिरायला, निसर्गाच्या सान्निध्यात शांतता अनुभवायला, आणि चालण्यातून स्वतःशी संवाद साधायला आवडतं.

ट्रेकिंगमुळेच माझं शरीर सक्रिय, मन स्थिर आणि आत्मा समाधानी राहते

हा ब्लॉग सुरू करण्यामागचा उद्देश – मराठीतून सुबोध आणि सच्च्या भाषेत योगाविषयीचा संवाद साधणे. जर तुम्ही योगसाधना करत असाल, किंवा सुरु करायची योजना करत असाल, तर हा ब्लॉग तुमच्यासाठी उपयोगी ठरेल अशी माझी श्रद्धा आहे.

धन्यवाद,
– Tekdi ते ताडासन

Post a Comment

0 Comments

"टेकडी ते ताडासन: एक योगप्रवासाची सुरुवात"

1.1 UNESCO and the Indian Yoga Heritage – A Legacy of Spiritual Wisdom