भामचंद्र डोंगर – संत तुकाराम महाराजांच्या आत्मसाक्षात्काराची गाथा
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव आणि त्याच्या पासून साधारण 10 ते 12 किमी असलेला भामचंद्र डोंगर किंवा भामगिरी – याला केवळ एक ट्रेकिंग डेस्टिनेशन म्हणणं अन्याय ठरेल. कारण हे स्थळ आहे साक्षात आत्मसाक्षात्काराचं, ईश्वरप्राप्तीचं आणि भक्तीच्या परम अनुभवाचं.
या अशा पवित्र ठिकाणी ट्रेक करण्याचा विचार नक्की झाला...ट्रेक मागे... दोन उद्देश होते ते म्हणजे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणाचे दर्शन होईल आणि श्रावण महिन्यामध्ये रिमझिम सरीचा आनंद घेत हिरवागार डोंगर पाहता पाहता ट्रेक करता येईल आणि त्या ट्रेकमुळे थोडासा फिटनेस देखील आजमवता येईल.
हा भामचंद्र डोंगर देहू पासून साधारण 10 ते 12 की.मी. अंतरावर आहे, आता पायथ्या पर्यंत जायला चांगला डांबरी रस्ता आहे, खाली पार्किंग मात्र पुरेसे उपलब्ध नाही. पायथ्या जवळच शाळा आहे व PMPML ची पण सोय आता झाली आहे, मोजक्याच बसेस येतात , अगदी पायथ्यालाच सोडतात.
एके काळी अतिशय शांत व निर्मनुष्य असलेला परिसर, ज्याच्या शांततेची भुरळ जगद्गुरू तुकाराम महाराजांनाही पडली आणि ते तिथं साधनेसाठी आले. आता मात्र मोठ्या प्रमाणावर औद्योगीकरण झाले आहे डोंगराच्या तीनही बाजूने मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती झाल्या आहेत. असे असले तरी एकंदरीतच येथील शांत वातावरणात नक्कीच समाधी लागेल असेच हे ठिकाण आहे.
वन खात्याने मात्र डोंगरावरती मात्र मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्याने बऱ्यापैकी मोठी झाडे तिथे आहेत, दिवसा देखील पाहिल्या टप्प्यात सावली असते, पहिल्या 7 ते 8 मिनिटांची वाट थोडीशी पावसामुळे घसारा असणारी व दमवणारी आहे, ही चढण पार केल्यानंतर अतिशय सुंदर दृश्य दिसायला सुरुवात होते चोहीकडे झाडी, रिमझिम श्रावणसरीने हिरवागार झालेला डोंगर त्यामुळे वातावरणात आलेला प्रसन्न व अल्हाददायकपणा आपल्याला आपण थोड दमलोय अशी जाणीव येऊन देत नाही.
वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये किंवा आपल्या चालण्याच्या गतीनुसार तीस ते चाळीस मिनिटांमध्ये आपण डोंगरावरच्या पहिल्या मंदिरे जवळ येऊन पोहचतो, इथे जरा माकडांपासून सावधगिरी बाळगा, पिशव्या सांभाळा.
या ठिकाणी सातवाहनकाळातील लेण्या आहेत. पहिल्या गुहेत शंकराचे मंदिर आहे. बाहेर सभामंडप व आत छोटे शिवलिंग आहे. गुहेबाहेर पाण्याचं टाकंही आहे. मंदिराच्या शेजारील गुहेत लोखंडी जाळ्या ठोकून बंद केलेली आहे. तिचा उपयोग वारकरी धर्मशाळेसारखा करतात. .
इथून पुढे अगदी थोड्याच्या अंतरावर ज्या ठिकाणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी साधना केली त्या गुहेकडे जाणारी एक पायऱ्यांची वाट आहे यावरून एकावेळी जेमतेम एकच माणूस जाईल अशी वाट असून या ठिकाणी सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग देखील लावली आहे..
त्याच गुहेच्या थोडसं उजव्या बाजूला जर आपण वरच्या दिशेने पाहिलं तर आपल्याला अतिशय निसर्गाचा सुंदर असाच चमत्कार बघायला मिळतो एक प्रचंड मोठं भुयार सदृश विवर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि पावसाळ्यामध्ये त्यातून पाणी खालीपर्यंत ठिपकत येत असतं ..
पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर डाव्या बाजूने वळसा घालून आपण जर पुढे जात राहिलो तर अगदी थोड्याच अंतरावर उजव्या बाजूला आपल्याला एक गुहेत पाण्याचे टाक दिसतं जे कुलूप लावून बंद करून ठेवले आहे, त्यातील पाण्याचा वापर या डोंगरावर पिण्यासाठी केला जातो..
तिथून तसेच थोडेसे पुढे गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला वरती जाणारी एक असष्ट पायवाट दिसते, या वाटेन वर जायला सुरुवात केल्यास साधारण पंधरा ते वीस मिनिटात आपण डोंगराच्या माथ्यावरती येऊन पोहोचतो या ठिकाणावरून डोंगराच्या मागच्या बाजूचा सुंदर नजारा दिसतो....
धुक्याने वेढलेला परिसर, नितांत सुंदर आणि शांत रमणीय वातावरण पाहून पुन्हा आपण परतीच्या मार्गाला लागतो...एक अविस्मरणीय अनुभव व अनुभूती घेऊन..
सावधगिरी..
पहिल्या टप्प्यात पावसामुळे वाट थोडी निसरडी झालेली असते या ठिकाणी सावधगिरीने जा, धोकादायक नाहीये पण सावधगिरी घेणे गरजेचं..
वरती पोचल्यावर माकडे खाऊ मिळेल या आशेने जवळ येण्याचा प्रयत्न करतात काळजी घ्या..
सोबत जाताना पाणी आणि थोडा खाऊ जरूर ठेवा.. आणि आणि परत येताना मागे कुठल्याही प्रकारचा कचरा ठेवू नका..
गुहेच्या वरच्या डोंगरावर जाताना काळजी घ्या... पावसामुळे पायवाटे वरती पाणी वाहत असू शकत पायाखालचे दगड कधी कधी हलू शकतात त्यामुळे वरच्या टप्प्यावर जाताना सावकाश जा, वाट सोपी आहे धोकादायक नाही.. काळजी घेणे आवश्यक..
एकंदरीत हा ट्रेक किंवा अध्यात्मिक ट्रेक तसा सोपा आहे आणि कमी वेळेत मन प्रसन्न करणारा दर्शन व निसर्गाचे अनुभूती देणार आहे..
#योग_सुंदर_आहे
#टेकडीतेताडासन
चालता-बोलता योगी 🚶♂️
#तुकाराममहाराज
#भामगिरी
#टेकडीतेताडासन
#आध्यात्मिकट्रेक
#श्रद्धा_आणि_साक्षात्कार
#मराठीट्रेक
#spiritualmaharashtra




1 Comments
यावर मला तुम्हा अनुभवी लोकांच मत जाणून घ्यायला आवडेल
ReplyDelete🗨️ तुमचं मत खाली जरूर कळवा! नाव टाकून साधं "छान वाटलं" लिहिलंत तरी आम्हाला बळ मिळेल 🙏