दोन पावलांवर असलेलं समाधान – योग सुरू करण्यासाठी फक्त आजचा दिवस पुरेसा आहे!

 

🪷 हे का सुरू केलं? – एक मनातलं बोलणं...

कधी कधी वाटतं, आपण सगळेच काही शोधत असतो – कुठे तरी शांतता, स्थिरता, समजूत, किंवा कदाचित... स्वतःला.

मी योगासने सुरू केले तेव्हा, मी कुठलाही “गुरू” नव्हतो, ना काही परिपूर्ण साधक आणि आजही नाही, मी फक्त एक विद्यार्थी आहे, मला फक्त एवढंच जाणवलं होतं मला कायमच विद्यार्थीच रहायचे आहे. 


वयाच्या एव्हढ्या उशीरा का होईना पण मी योगशिक्षक होण्याचं ठरवलं आणि झालो ही, गेली एक वर्ष मी आसनांची साधना करत आहे.


आपण किती जगणार हे आपल्याला माहीत नाही, पण जेवढ जगणार तोंपर्यंत मी ’फिट’ आहे का ? , स्वावलंबी राहणार का? हे  महत्वाच आहे, उतारवयातच कशाला , कोणत्याही वयात आजाराने जर्जर होऊन औषधे, गोळ्या खाऊन परावलंबी जीवन जगण्यात काय अर्थ.



Yog dhyan, yogi


योग – हा शब्द खूप आधीपासून माहित होता. पण अर्थ समजणं मात्र खूप उशिरा झालं. पहिल्यांदा आसन सुरू केलं, मग श्वासाकडे लक्ष गेलं, मग वाटलं – शरीरा बरोबर मन तयार करायला हवं म्हणजे आसन साधना पण अखंडित होईल.

हळूहळू सराव सुरू झाला आणि फरक जाणवायला लागला... हे सगळं उलगडायला लागलं. पण खरं सांगायचं तर – अजूनही मी शिकतोय, अजूनही शरीर जसे पाहिजे तसं वळत नाही, अजूनही आसनांची आदर्श स्थिती घेता येत नाही,  अजूनही करण्याचा प्रयत्न चालूच आहे.


आता कुठे सुरवात केली, एक वर्षच साधना झाली, पण अजूनही मन भरकटतं, संयम सुटतो, आळस येतो. 


एकटेपण जाणवलं नाही, कारण या प्रवासात विचारांची संगत मिळाली. जर अशीच संगत अधिक लोकांची झाली, तर हा योगप्रवास अधिक समृद्ध आणि नियमित होईल, अशी आशा नव्हे – विश्वास आहे.



मी "माझा योग" शोधतोय  माझा फिटनेस शोधतोय, ज्यांकडे खूप दुर्लक्ष झालं होत – आणि  तुम्हीही  तुमच्या साठी  तुमच्यातला फिटनेस शोधात रहा या योग प्रसारात सामील व्हा, स्वतः योग करा, दुसऱ्यांनाही प्रेरणा द्या सहभागी करा. 

 

🙏 पुढे काय?

हे केवळ सुरुवात आहे. प्रत्येक पायरी म्हणजे स्वतःकडे एक नवीन पाऊल. साधेपणाने, प्रामाणिकपणे, थोडा थोडा प्रयत्न करा, कारण खरंच – अजूनही शक्य आहे.


तुम्ही योग का सुरू कराल? खाली comment करून नक्की सांगा! तुमच्या अनुभवातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. 🙏


#योग_सुंदर_आहे 
#टेकडीतेताडासन
चालता-बोलता योगी 🚶‍♂️


📚 संदर्भ:
संपूर्ण योग विद्या — राजीव जैन ‘ त्रिलोक ’
योग प्रवेश — डॉ.विश्वास मंडलिक
योग परिचय भाग एक — डॉ.विश्वास मंडलिक
योग परिचय भाग दोन — डॉ.विश्वास मंडलिक
योग परंपरा भाग एक — डॉ.विश्वास मंडलिक

Post a Comment

2 Comments

  1. मला तुम्हा अनुभवी लोकांचा मत जाणून घ्यायला आवडेल

    ReplyDelete

🗨️ तुमचं मत खाली जरूर कळवा! नाव टाकून साधं "छान वाटलं" लिहिलंत तरी आम्हाला बळ मिळेल 🙏

"टेकडी ते ताडासन: एक योगप्रवासाची सुरुवात"

1.1 UNESCO and the Indian Yoga Heritage – A Legacy of Spiritual Wisdom